सहायक पोलीस निरीक्षकाची झाली बदली, पोलीस उपायुक्तांनी घातल्या फुलांच्या पायघड्या.. स्वतःच्या गाडीतून केले रवाना - पोलीस उपआयुक्त गजानन शिवलिंग राजमाने
नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील ( Nagpur City Police ) पोलीस उपआयुक्त गजानन शिवलिंग राजमाने ( DCP Gajanan Rajmane ) यांनी त्यांच्या बदली झालेल्या कनिष्ठ सहकाऱ्याला आगळ्या- वेगळ्या पद्धतीने दिला निरोप दिला. सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीवर मुंबई शहर येथे बदली झाली आहे. आज विशाल माने यांना निरोप देण्यासाठी स्वतः डीसीपी राजमाने यांनी त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. एवढंच नाही तर विशाल माने यांच्यावर फुलांची बरसात करून, डीसीपी राजमाने यांनी स्वतःच्या गाडीतून माने यांना मुंबईसाठी रवाना केलं. याआधी सुद्धा डीसीपी राजमाने ज्यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्ह्णून कार्यरत होते तेव्हा सेवानिवृत्त झालेल्या सहकाऱ्याला अश्याच प्रकारे निरोप दिला होता. त्यांना निरोप देतांना स्वतः पोलीस उपायुक्त गुन्हे गजानन शिवलिंग राजमाने यांनी त्यांचे गाडीचे स्वारथ्य केले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST