महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rapper Dharmesh Parmar Death : धर्मेशचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यानेच; धर्मेशच्या वडिलांचे स्पष्टीकरण - MC TOD FOD फेम प्रसिद्ध रॅपर धर्मेश परमार निधन

By

Published : Mar 22, 2022, 7:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

मुंबई - MC TOD FOD फेम प्रसिद्ध रॅपर धर्मेश परमार यांचे 20 तारखेला वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाले. धर्मेश यांच्या निधनानंतर त्यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र, या बातम्या खोट्या असल्याचे सांगत कृपया अफवा पसरवू नका, असे आवाहन धर्मेश यांच्या वडिलांनी केल आहे. धर्मेश एका कार्यक्रमासाठी नाशिकला गेला होता. त्यांचा कार्यक्रम आटोपला होता. 20 तारखेला ते मुंबईला येणार होते. जेवण झाल्यानंतर ते सर्व मित्र त्या गार्डनमध्ये खेळत होते. खेळता-खेळता धर्मेशला घाम यायला लागला म्हणून तो खाली बसला. खाली बसला यातच त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details