Video : काटेपूर्णा अभयारण्याला वनोजाजवळ भीषण आग - Katepurna Wildlife Sanctuary
वाशिम: अकोला जिल्ह्यात पसरलेल्या काटेपूर्णा अभयारण्याला वनोजाजवळ ( Extreme fire near Kanepurna Sanctuary ) आज दुपारी दिडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आग विजवण्यासाठी काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्याचे कर्मचारी ( Katepurna Wildlife Sanctuary Staff ) , साळुंकाबाई राऊत महाविद्यालय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकातील सदस्य आणि अग्निशामक दल मंगळरूपीर यांच्या वतीने प्रयत्न चालू आहेत. घटनास्थळी अग्निशमक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच यंत्रणा प्रयत्न करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST