महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

International Sex Workers Day Event : किन्नर, देहविक्री करणाऱ्या कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पुण्यात विशेष कार्यक्रम - International Sex Workers Day Event in Pune

By

Published : Apr 1, 2022, 5:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

पूणे - नुकतेच ३१ मार्च हा जागतिक किन्नर ओळख दिवस ( International Transgender Day ) आणि ३ मार्च हा आंतरराष्ट्रीय देहविक्री अधिकार दिवस ( International Sex Workers Day ) म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला, किन्नर, ट्रान्सजेंडर यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अभिजीत जोशी मेमोरिअल फाऊंडेशन, मिडास टच ब्युटी इन्टिट्यूट आणि सहारा प्रॅाडक्शन हाऊस या संस्थेने सन्मान आत्मशक्तीचा या कार्यक्रमाद्वारे पाऊल ( International Sex Workers Day Event in Pune ) उचलले आहे. यावेळी किन्नर, देवदासी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, ट्रान्सजेंडर यांनी रांगोळी, मेहंदी, नृत्य, वादन, गायन, कायदेविषयक नाटिका, हस्तकला यांसारख्या कलांना समाजासमोर सादर केले. यावेळी अभिजीत मेमोरिअल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अथर्व जोशी, सचिव नीतू कुमार, रसिका भवाळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना मिडास टचच्या संचालिका अंजली जोशी आणि सहारा प्रॅाडक्शन हाऊसचे डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी सांगितले की, स्रीमधील स्त्रीत्व, माणुसकीमधील माणुसकी जपत या दुर्लक्षित समाजाला समाजात स्थान देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला. मानवतेचा धर्म जपण्याचा आणि समाजाचे ऋण फेडण्याचा हा एक वेगळा प्रयत्न म्हणावा लागेल. सहभागी कलाकारांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details