Kolhapur North Assembly by-election : पंढरपुरात मंत्रिमंडळ येऊन बसले तरी पराभव झाला.. कोल्हापुरातही भाजपच येणार : सत्यजित उर्फ नाना कदम - सत्यजित कदम महाविकास आघाडीवर टीका
कोल्हापूर : मध्यंतरी पंढरपूर ( Pandharpur Assembly By-election ) येथे झालेल्या निवडणुकीत राज्याचं सगळं मंत्रिमंडळ येऊन बसलं होतं. तरीही त्यांचा तेथे पराभव झाला. आता कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही भाजपच येणार असल्याचा दावा भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम ( Satyajeet Kadam Criticized MVA ) यांनी केला. ईटीव्हीशी त्यांनी संवाद साधला. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ( Kolhapur North Assembly by-election ) जाहीर झाली आहे. याठिकाणी भाजपकडून सत्यजित उर्फ नाना कदम यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. यापूर्वी सुद्धा कदम यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा सुद्धा यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली असून उमेदवार कोणीही असो यावेळी भाजपचाच विजय असणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST