ETV Bharat Womens Day Special : दुर्गा-अहिल्या पथकातील रेल्वे महिला वेल्डर; पाहा, महिला दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...
मुंबई - निळा पॅट, त्यावर निळा शर्ट, आगीपासून संरक्षण करणारे जॅकेट बूट आणि डोळ्यांवर काळा चष्मा घालून आज मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमधील दुर्गा-अहिल्या पथकातील महिला वेल्डर काम करत आहेत. रेल्वेचा डब्यांच्या बॅटरी बॉक्स तयार करण्याचे आणि दुरुस्तीचे काम या महिला वेल्डरांकडून करण्यात येत आहे. ( Womens Welder ETV Bharat Special Story ) या महिलांच्या कामाची जिद्द पाहून आता रेल्वेनेही वेल्डर या पदावर गेल्या काही वर्षात अनेक महिलांची भरती केली आहे. माटुंगा वर्कशॉपमध्ये पुरुषांबरोबरच महिला कर्मचाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. अगदी अवजड सामान उचलण्यापासून तर सर्व प्रकारची कामे महिला कर्मचारी करतात. ट्रेन डब्याच्या सफाईपासून डागडुजीपर्यंतची कामे वर्कशॉपमध्ये करतात. महिला दिनाच्या निमित्ताने दुर्गा-अहिल्या पथकातील महिला वेल्डरसंदर्भातील पाहा, ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST