Mumbai Meri Jan : मुंबईकरांच्या धकाधकीला थांबा देणारी सीएसएमटी जगात भारी - मुंबई मेरी जान
मुंबई - मुंबईकरांच्या धकाधकीचा प्रवासाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विराम मिळतो. मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आहे. यांपैकी एक म्हणजे, जगविख्यात सीएसएमटी इमारत आहे. या वास्तूची उभारणी गॉथिक शैलीतील सी अक्षराच्या आकारात तयार केली आहे. या वास्तूला 2004 साली युनेस्कोच्यावतीने जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे. या वास्तुवैभवाला देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनल्यामुळे 2016 साली देशातील दहा महत्वाच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये निवडण्यात आले आहेत. या ऐतिहासिक वास्तुविषयी ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST