Goa Assembly Election Etv Bharat NewsRoom Live : 'शपथ दिली असली तरी स्पष्ट बहुमत न मिळाल्यास घोडेबाजार होण्याची शक्यता' - गोवा महासंग्राम ईटीव्ही भारत
हैदराबाद - पूर्ण बहुमत न मिळाल्यास निवडणुकीच्या निकालानंतर घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत ईटीव्ही भारत महाराष्ट्राचे स्टेट हेड विजय लाड यांनी व्यक्त केले आहे. आज गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यासह विविध पक्षांच्या एकूण 301 उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. गोव्यातील मतदान आणि तेथील सध्याची परिस्थिती राजकीय समीकरणं यासदर्भात ईटीव्ही भारतच्या न्यूजरुम लाईव्हमध्ये महाराष्ट्राचे स्टेट हेड विजय लाड आणि शिफ्ट इंजार्ज उन्मेश खंडागळे यांनी सहभाग घेतला. पाहा, गोव्याच्या राजकीय समीकरणाबाबत ते काय म्हणाले?
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST