Taapsee Pannu in trouble : धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीमुळे तापसी पन्नू आली अडचणीत - सनातन धर्माचा अवमान
नुकत्याच झालेल्या फॅशन गालामधील बॉलिवूड अभिनेत्री-निर्माती तापसी पन्नूचा व्हिडिओ तिच्यासाठी त्रासदायक ठरला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तापसी लॅक्मे फॅशन वीकमध्ये रिलायन्स ज्वेअल आणि मोनिशा जयसिंगसाठी शो स्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरली होती. यावेळी तापसी पन्नूने देवी लक्ष्मीच्या स्टेटमेंट नेकपीससह लाल पोशाख घातला होता. तापसीने तिच्या रॅम्पवरील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे जो आता वादात सापडला आहे. कारण तिच्याविरोधात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तापसीविरुद्ध हिंद रक्षक संघटनेचे संयोजक एकलव्य सिंग गौर आणि भाजप आमदार मालिनी गौर यांच्या मुलाने सनातन धर्माचा अवमान करण्याच्या कथित नियोजित प्रयत्नाची तक्रार दाखल केली आहे. मुंबईत १२ मार्च रोजी झालेल्या रॅम्पवॉकमध्ये तापसीने गळ्यामध्ये जो दागिना परिधान केला होता, त्यावर लक्ष्मीचा फोटो असल्याबद्दलची ही तक्रार आहे.