व्हिडिओ : नातीचे गुणगान करत नीतू कपूरने दिली आलियाची हेल्थ अपडेट - आलिया भट्ट आई बनली
आलिया आणि रणबीरच्या बाळाच्या आगमनाने नीतू कपूरही आजी झाल्यामुळे आनंदित झाली आहे. रविवारी संध्याकाळी नीतूने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला उत्साह व्यक्त केला. तिने आलिया भट्टच्या तब्येतीचे अपडेट देखील दिले आणि तिची नात कशी दिसते या प्रश्नांना उत्तर दिले. आलिया आणि रणबीर रविवारी सकाळी मुंबईतील सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पोहोचले होते. काही वेळातच आलियाची आई सोनी राजदान आणि नीतू कपूरही हॉस्पिटलमध्ये आल्याचे दिसले. त्यानंतर आलेल्या या गोड बातमीने चाहत्यांनाही आनंद झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST