मराठी चित्रपटसृष्टीशी जोडल्याचा अभिमान, मन कस्तुरी रे ट्रेलर लॉन्च प्रसंगी तेजस्वी प्रकाशचे विधान - तेजस्वी प्रकाश लेटेस्ट न्यूज
बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश मन कस्तुरी रे या चित्रपटातून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी चित्रपट एक रोमँटिक ड्रामा आहे ज्यामध्ये तेजस्वी रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल बोलताना तेजस्वी म्हणाली की, तिला मराठी चित्रपटसृष्टीशी जोडल्याचा अभिमान आहे. मराठी सिनेमा देशव्यापी व्हावा अशी तिची इच्छा असल्याचेही या अभिनेत्रीने सांगितले. तेजस्वीसोबत लक्ष्मीकात बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST