लग्नाचे आमिष दाखवून शीझान खानने तुनिषा शर्माचा वापर केला, मृत अभिनेत्रीच्या आईचा आरोप - शीझानला शिक्षा झाली पाहिजे
अभिनेत्री तुनिषा शर्माने उचललेले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल हे शीझान खानसोबतचे झालेल्या ब्रेकअपमुळे असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर, मृत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी या प्रकरणात धक्कादायक विधान केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, शीझानने त्याच्या पूर्वीच्या मैत्रिणीशी संबंध असताना तुनिषाची फसवणूक केली. शीझानने लग्नाच्या बहाण्याने तुनिषाचा वापर केला आणि नंतर अचानक सर्व संबंध तोडले म्हणून शीझानला शिक्षा झाली पाहिजे, असेही वनिता शर्मा यांनी सांगितले. तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनीही शीझानवर आरोप केले आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST