Shahrukh Khan News: लालबागच्या राजाचरणी बॉलिवूडचा किंग खान नतमस्तक, पाहा व्हिडिओ - Lalbaghcha Raja darshan
Published : Sep 21, 2023, 8:43 PM IST
मुंबई Shahrukh Khan News : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी (Lalbaghcha Raja darshan) आला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मुलगा अब्राम खान, त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि रवी सोबत होते. बुधवारी बॉलीवूड स्टार वरूण धवन, कार्तिक आर्यन आणि ईशा देओल यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. आज बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आपल्या मुलासोबत लालबागच्या राजाचरणी नतमस्तक झालेला पाहावयास मिळाला. अशा प्रकारे दहा दिवस लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी पाहायला मिळतेय. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करत असतात. (Ganeshotsav 2023) बॉलीवूड सेलिब्रिटी लालबागच्या राजाचरणी हजेरी लावताना दिसत आहेत.