sara ali khan in ujjain : सारा अली खानने 'जरा हटके जरा बचके' रिलीज होण्यापूर्वी घेतले महाकालचे दर्शन - सारा अली खानचे महाकालचे दर्शन
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने बुधवारी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील महाकालेश्वर मंदिरात पूजा केली. यावेळी तिने 'भस्म आरती'मध्येही सहभाग घेतला होता. भस्म आरती (भस्म अर्पण) हा येथील प्रसिद्ध विधी आहे. हे ब्रह्म मुहूर्तामध्ये पहाटे 4 ते 5:30 दरम्यान केले जाते. मंदिर समितीच्या भस्म आरतीला उपस्थित राहण्याच्या परंपरेनुसार तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. भस्म आरतीमध्ये महिलांना साडी नेसणे बंधनकारक आहे.
सारा गेली उज्जैनला :भस्म आरतीच्या वेळी तिने मंदिराच्या नंदीहालमध्ये बसून प्रार्थना केली. यासोबतच साराने गर्भगृहात जलाभिषेकही केला. विशेष म्हणजे तिची महाकाल मंदिरात येण्याची ही पहिलीच वेळ नाही, सारा याआधीही बाबा महाकालच्या दर्शनासाठी आली होती. दर्शनादरम्यान ती मंदिराच्या आवारात असलेल्या कोठीतीर्थ कुंडातही उभी राहून भक्तीत तल्लीन झालेली यावेळी दिसून आली. मंदिराचे पुजारी संजय गुरू म्हणाले, 'सारा अली खानची बाबा महाकालवर अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे ती अनेकदा येथे दर्शनासाठी येत असते.
जरा हटके जरा बचके प्रमोशन :सारा आणि विक्की कौशल त्यांच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजस्थान, कोलकाता, अहमदाबाद आणि लखनऊ येथे गेले होते. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सारा या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आयपीएल मॅच बघायला गेली होती ज्यात तिने चैन्नई सुप्पर किंगला सपोर्ट केला होता. शिवाय या दरम्यान तिच्यासोबत विक्की कौशल देखील होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा आपला पूर्ण वेळ देत आहे. या चित्रपटात विक्की 'कपिल' आणि सारा 'सौम्या'ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शित लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची कहाणी लग्न करून एकत्र कुटुंबात स्थायिक झालेल्या दोन प्रेमी युगुलांची आहे, जे काही वर्षांनी वेगळे होण्याची इच्छा करत असतात. तसेच चित्रपटात आपल्याला विक्की आणि सारा एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे. हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :