राजौरीतील दहशतवादविरोधी चकमकीतील हुतात्मा जवानांना लष्करानं वाहिली श्रद्धांजली
Published : Nov 24, 2023, 3:42 PM IST
राजौरी (जम्मू-काश्मीर) Rajouri Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील घनदाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या भीषण चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांना शुक्रवारी लष्करानं श्रद्धांजली वाहिली. (Tribute to Martyred Soldiers) यावेळी लष्कराच्या जवानांतर्फे पुष्पचक्र अर्पण करून अश्रूपूर्ण निरोप देण्यात आला. बुधवारपासून सुरू असलेल्या गोळीबारात लष्कराच्या दोन कॅप्टनसह पाच जवानांना प्राण गमवावे लागले होते. (Army Encounter with Terrorists) राजौरी जिल्ह्यातील बाजीमल भागात दहशतवादी विरुद्ध लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकामध्ये अभियान राबविले होते. यावेळी सैन्याच्या बाजूनं पाच जण ठार झाले, तर लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर आणि क्वारी नावाच्या स्निपरसह दोन दहशतवादी देखील गुरुवारी ठार झाले.
खोऱ्यात पसरवली होती दहशत :लष्कराने पुढे सांगितलं की, चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात 'शस्त्रसामग्री' जप्त करण्यात आली आहे. या चकमकीत सहभागी दहशतवाद्यांचा खोऱ्यात अनेक हल्ले करण्यात हात असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यात डांगरी घटनेचाही समावेश आहे. ज्यात 23 जानेवारी रोजी सहा निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. यासोबतच त्यांनी राजौरीतील पुंछ आणि कांडी येथेही काही घटना घडवून आणल्या होत्या.
दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले :लष्कराच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, लष्कराने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यांतील दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यात यश आलं आहे. दरम्यान, शुक्रवारी लष्करी अधिकारी आणि सैनिकांनी हौतात्म्य देणाऱ्या सोबत्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण केली.