प्रभासने लाल किल्ल्यावरील रामलीला सोहळ्यात केले 'रावण दहन' - रामलीला कार्यक्रमात आदिपुरुष टीम
नवी दिल्ली - 05 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेता प्रभासने ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या राम लीला उत्सवाला भेट दिली. दिल्लीतील सर्वात मोठ्या रामलीलाला हजेरी लावल्यानंतर प्रभासचा सन्मान करण्यात आला. यावेळी 'रावण दहन' करण्याचा सन्मान प्रभासला मिळाला. लवकुश रामलीला समितीने आयोजित केलेल्या उत्सवासाठी, अभिनेता प्रभास त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह उपस्थित होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST