महाराष्ट्र

maharashtra

पहलाज निहलानींनं घेतला प्रसून जोशीशी पंगा

ETV Bharat / videos

Pahlaj Nihalani on CBFC : पहलाज निहलानींनं घेतला प्रसून जोशीशी पंगा, सेन्सॉरच्या कारभाराचा पर्दाफाश - Pahlaj Nihalani takes dig at Prasoon Joshi

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 5:31 PM IST

Pahlaj  Nihalani on CBFC  :  सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या मुंबई कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचा व आपल्याकडे साडे सहा लाखाची लाच मागितल्याचा आरोप तमिळ अभिनेता विशालनं केला आहे. त्यानं एक व्हिडिओ पोस्टकरुन या आरोपांचे खुलासा केला होता. यानंतर सीबीएफसीचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी विशालच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. विशालच्या आरोपांना उत्तर देताना निहलानी म्हणाले की, 'हे खरं आहे की निर्मात्याने स्वत: लाच दिल्याचं सांगितलंय... यामुळे सीबीएफसीच्या कारभाराचा पर्दापाश झाला आहे. ... जेव्हा या बोर्डाचं प्रशासन आलं तेव्हा आम्ही 'ना खाऊंगा ना खाने दुंगा' असं ऐकले आहे. ... मात्र, आता सीबीएफसी उघडपणे लाच घेत असल्याचं दिसतंय...' अशी दुर्दैवी घटना उघडकीस आल्याने माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी विद्यमान अध्यक्ष  प्रसून जोशींवर टीकास्त्र सोडलं आहे.  

ABOUT THE AUTHOR

...view details