फायटरसाठी लष्करी हवाई तळावर हृतिक रोशन घेतोय प्रशिक्षण - आसाम लष्करी हवाई तळावर हृतिक रोश
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन मंगळवारी आसाममधील तेजपूर येथे पोहोचला. हृतिकने फायटर चित्रपटामध्ये हवाई दलाच्या पायलटची भूमिका साकारली आहे, ज्यासाठी तो लष्करी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सलोनीबारी येथील लष्करी हवाई तळावर प्रशिक्षण आणि शूटिंग करेल. या चित्रपटात हृतिक सुखोई ३० फायटर जेटमध्ये दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. ज्याचे शूटिंग 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST