महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : गडचिरोलीत डोंगर दरीतून पायी प्रवास करत कुटुंबीयांनी आजारी महिलेला खांद्यावर २० किलोमीटर पायी आणले - Amrit Mahotsav

By

Published : Aug 5, 2022, 7:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

गडचिरोली - देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत ( 75 years since independence ) असतांना देखील आदिवासींच्या जीवनात नरक यातनाच ( Hell torture in tribal life ) दिसत आहेत. एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( celebrated Amrit Mahotsav ) जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे मात्र, आदिवासींना प्राथमिक सुविधा देखील मिळत नाहीत. आदिवासी खेड्यात रस्ते, आरोग्य, शिक्षणच्या मूलभूत सुविधांचा अभाव ( Deprived of tribal health facilities ) असल्याने आजही रुग्णांना खाटवरून पायवाटेने, दावखान्यपर्यंत आणले जाते. नुकतीच छत्तीगढ राज्यातील गटकल गावातील एका ७० वर्षीय आदिवासी महिलेला उपचारासाठी खाटारून महाराष्ट्र सीमेवरील लाहेरी प्रथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. चिमिरी केये पुंगाटी या महिलेला मलेरिया झाला आहे. तिला कुटुंबीयांनी उपचारासाठी जवळपास 20 किलोमीटर पायी डोंगरातून प्रवास ( Tribal travel 20 km for treatment ) करून लाहेरी प्रथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. खाटेवर टाकून गुंडेनूर नाल्यापर्यंत खांद्यावर आणल्यानंतर गुंडेनुर नल्यावर पोहचताच लाहेरी प्रथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका पाठवून तेथून लहेरी दवाखान्यात आणले. जवळपास 20 कि.मी पायदळ डोंगर दऱ्यातुन प्रवास करत ते सांयकाळी 5 वाजता लाहेरी पोहोचले. लगेच लाहेरी प्रथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.चैतन्य इंगे यांनी उपचार सुरु केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details