महाराष्ट्र

maharashtra

संतोष गायधने

ETV Bharat / videos

Threat To Anna Hazare : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी, १ मे रोजी हत्या करण्याचा इशारा - social activist Anna Hazare

By

Published : Apr 12, 2023, 4:03 PM IST

अहमदनगर : जिल्ह्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने यांनी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याची धमकी दिली आहे. शेतीच्या वादातून आमच्यावर अन्याय होत आहे. कुटुंबावर खोट्या तक्रारी दाखल करुन धमकवण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच वारंवार तक्रार करुनही कोणीही दखल घेत नल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंसह वरीष्ठ पोलीस अधिकारी, मंत्र्यांनाही निवेदन दिले तरी काहीच होत नसल्याने संतोष गायधने यांनी अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशारा दिला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने यांनी अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शेतीच्या वादात हातमिळवणी करून कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतीच्या वादात गटातील 96 जणांनी कुटुंबावर दबाव टाकला असून खोटे गुन्हे दाखल करून भीती दाखविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंब दहशतीत जगत आहे. या संदर्भात अण्णा हजारेंसह वरिष्ठ पोलीस आणि मंत्र्यांना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने संबंधितांची निराशा झाली आहे. आत्महत्येसाठी राष्ट्रपतीकडे परवानगी मागितल्याचे संतोष गायधने यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अण्णा हजारे यांना मॅनेज करण्यात आल्याचा आरोप गायधने यांनी केला आहे. 1 मे रोजी अण्णा हजारेंना राळेगणसिद्धीला जाऊन ठार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिली आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details