Aaditya Thackeray : शिंदे-भाजप सरकार कोसळणारच; आदित्य ठाकरेंचा दावा - Chief Minister Eknath Shinde government
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde Gov ) यांचे सरकार केवळ दीड महिन्याचे सरकार आहे. कोणत्याही परिस्थितीत ते कोसळणारच आहे असे आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी म्हटले आहे. जे आमच्याशी गद्दारी करून दुसऱ्या गटात जाऊन मिसळले आहेत, त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिक राहावं. आपल्या ( Shiv Sena rebel MLA ) बंडखोरांनी आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे ते कोल्हापूरात बोलत होते. बंडखोरांनी निवडणुकीला सामोरे जावे, शिवसैनिक त्यांना आपली जागा दाखवून देतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने युवा शिवसैनिक उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST