आर्यन खानने चाहत्यांकडून स्वीकारला हॅण्ड किस, गुलाब आणि सलाम - पाहा व्हिडिओ - गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान
सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आर्यनला प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. गुरुवारी आर्यन मुंबईला परतताना विमानतळावर दिसला. जेव्हा तो विमानतळाबाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. एका चाहत्याने आर्यनला लाल गुलाबही दिला जो त्याने सलाम करत स्वीकारला. आर्यनने त्याच्या काही तरुण चाहत्यांची विनंती मान्य केली आणि त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले. त्याला पाहून त्याचा एक चाहता भावूक झाला आणि त्याने आर्यनच्या हाताचे चुंबन घेतले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST