महाराष्ट्र

maharashtra

Relive the memories of K Vishwanath

ETV Bharat / videos

Relive the memories of K Vishwanath : अरुणा इराणी यांनी दिला दिवंगत के विश्वनाथ यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा - Aruna Irani

By

Published : Feb 3, 2023, 3:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:40 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी दिवंगत दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शक असलेल्या विश्वनाथ यांचे वृध्दापकाळातील आजाराने निधन झाले. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक दिग्गज अभिनेते, अभिनेत्रींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

अरुणा इराणी म्हणाल्या की विश्वनाथसोबत काम करताना तिला रात्री झोप येत नसायची कारण दिग्दर्शक अतिशय सर्जनशीलपणे अभिनयाचे आव्हान द्यायचे. औरत औरत औरत चित्रपटाच्यावेळी अरुणा इराणी आणि अभिनेत्री रेखा एकत्र काम करत होत्या. संगीत, धनवान आणि औरत औरत औरत यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये विश्वनाथसोबत काम केलेल्या इराणीने सांगितले की, विश्वनाथ हे तिचे आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक होते.  

विश्वनाथ यांनी 1965 च्या आत्मा गोवरम या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, यासाठी त्यांना राज्य नंदी पुरस्कार मिळाला. चित्रपट निर्माता विश्वनाथ यांनी 1979 मध्ये त्यांच्याच सिरी सिरी मुव्वा या चित्रपटाचा रिमेक असलेल्या सरगमने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. कामचोर, शुभ कामना, जाग उठा इंसान, संजोग आणि ईश्वर या त्यांच्या इतर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटांचा समावेश आहे.

कोण होते के विश्वनाथ - दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील के. विश्वनाथ हे नामांकित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि गाजलेले अभिनेता होते. यांचे वडिलोपार्जित घर बापटलाच्या रायपल्ले जिल्ह्यातील पेडा पुलिवरू गावात आहे. 19 फेब्रुवारी 1930 रोजी विश्वनाथ यांचा जन्म काशिनाधुनी सुब्रह्मण्यम आणि सरस्वतम्मा यांच्या पोटी झाला. 2 फेब्रुवारी (गुरुवारी) रात्री उशिरा के. विश्वनाथ यांचे निधन झाले.  'शंकरभरणम', 'सागर संगम', 'स्वाती मुथयम' आणि 'स्वर्ण कमलम' यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांसाठी लोकप्रिय असलेले विश्वनाथ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

विश्वनाथ यांनी तेलुगू सिनेमांबरोबरच तमिळ आणि हिंदीमध्येही खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्यांना २०१६ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्वनाथ यांनी 1965 पासून 50 चित्रपट केले आहेत. ते तेलुगू चित्रपटसृष्टीत तसेच तमिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले.

ध्वनी कलाकार म्हणून आपला प्रवास सुरू करणाऱ्या विश्वनाथ यांनी 'शंकरभरणम', 'सागर संगम', 'स्वाती मुत्यम', 'सप्तपदी', 'कामचोर', 'संजोग' आणि 'जाग उठा इंसान' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार, 20 नंदी पुरस्कार (आंध्र प्रदेश सरकारने दिलेले) आणि जीवनगौरव यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details