महाराष्ट्र

maharashtra

Amitabh Bacchan 81st Birthday

ETV Bharat / videos

Amitabh Bacchan 81st Birthday : चाहत्यांना भेटायला मध्यरात्री 'जलसा' बाहेर पोहोचले बीग बी; पहा व्हिडिओ - जलसा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 7:08 AM IST

मुंबई Amitabh Bacchan 81st Birthday : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अमिताभ यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मध्यरात्री त्यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर गर्दी केली होती. ही गर्दी पाहून बिग बींवर त्यांच्या चाहत्यांचं किती प्रेम आहे, याची प्रचिती आली. आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांची बिग बींनादेखील काळजी आहे. त्यामुळंच घराबाहेर मोठ्या संख्येनं जमलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी अमिताभ मध्यरात्री 'जलसा' बाहेर आले होते. त्यावेळी त्यांनी तिथं जमलेल्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार मानले. 'जलसा' बाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिनवादन करतानाचा अमिताभ यांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अमिताभ यांना तिथं आलेलं पाहून चाहते खूप आनंदित झाले होते. बिग बींना पाहून चाहत्यांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी काहींनी शिट्टया वाजवत, ओरडत त्यांचा आनंद व्यक्त केला. जलसाच्या गेट बाहेर आल्यानंतर बिग बींनी हात जोडत चाहत्यांना अभिवादन केलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details