Actress Nupur Alankar Begging: प्रसिद्ध अभिनेत्री नुपूर अलंकार मागते आहे भिक्षा, व्हिडिओ व्हायरल - नुपूर अलंकार मथुरेत रस्त्यावर भीक्षा मागताना
मथुरा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री नुपूर अलंकार Nupur Alankar सध्या मथुरा येथील गोवर्धनमध्ये आहे. फिल्मी दुनियेच्या चकाचकतेपासून दूर, ती साध्वीच्या वेशात रस्त्यावर भिक्षा मागताना दिसत आहे. nupur alankar begging on the road. तिचा भिक्षा मागतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्री नुपूरने तिचे गुरु शंभू शरण झा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे तपस्वी जीवन स्वीकारले आहे. अलीकडेच तिच्या कुटुंबात घडलेल्या काही घटनांमुळे तिचे लक्ष देवाकडे वळाल्याचं बोललं जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST