VIDEO : भाचीचे कान मांडीवर टोचण्याची होती मामाची शेवटी इच्छा; इच्छापूर्तीसाठी बनवला पुतळा - तमिळनाडूतील कान टोचणी प्रथा
दिंडीगुल (तामिळनाडू) - तामिळनाडूत लहान मुलीचे कान टोचण्याचा समारंभ हा त्यांच्या मामाकडे करण्यात ( Earing Ceremony Tamil nadu ) येतो. यावेळी त्या छोट्याश्या चिमुकलीला मामा हा सोन्याचे दागिने भेट देऊन कान टोचणी करतो अशी एक प्रथा आहे. मात्र येथील दिंडीगुल जिल्ह्यातील ओट्टनचत्ताराम येथील सौंदरापांडी - पासुंगीली या दाम्पत्याच्या मुलाचा दोन वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. त्याची आठवण आणि या समारंभात त्याची उणिव भासू नये यासाठी त्या दाम्पत्याने त्याचा सिलीकॉनचा पुतळा ( Silicon statue of Youth in Dindigul ) बनवून त्यांची गावातून मिरवणूक काढली आणि कान टोचणीचा समारंभ मोठ्या थाटात साजरा केला. यावेळी पंडिदुराईची आई पासुंगीली सांगतात, "पंडितुराईची दीर्घ इच्छा होती की, आपल्या बहिणीची मुले आपल्या मांडीत टोचली जावीत. ती इच्छा पूर्ण न करता त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बंगळुरूमध्ये पंडितुराय यांची वास्तववादी मूर्ती बनवून समारंभात ठेवण्यात आली. आता माझ्या मुलाची इच्छा पूर्ण झाली आहे. नातवंडांनाही मामाच्या मांडीवर बसून कान टोचण्याची संधी मिळाली. माझी मुलगीही आनंदी आहे.” हा पुतळा बनवण्यासाठी 5 लाख रुपये खर्च आला आहे. या घटनेने ओट्टनछत्तीराम येथील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST