पालघर-मनोर मार्गावर धावत्या टेम्पोला आग; चालकाने टेम्पो थेट उतरवला नदीत - टेम्पो थेट उतरवला नदीत
पालघर - पालघर-मनोर मार्गावर मासवण नजीक सूर्या नदी ( Surya River ) पुलाजवळ धावत्या टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. गवताचे गठडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोतील गवताच्या गठड्यांनी अचानक पेट घेतला. बघता बघता आग पसरू लागली. आग इतरत्र पसरू नये व जास्त हानी होऊ नये, यासाठी प्रसंगावधान राखत चालकाने टेम्पो थेट सूर्या नदीत उतरवला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, टेम्पोतील गवताचे गठडे जळून खाक झाले आहे. ही घटना आज (दि. 23 मार्च) दुपारच्या सुमारास घडली
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST