Valentine Day : प्रेमाचे प्रतिक असलेल्या गुलाबाचे दर जैसे थे, पण विक्रीत घट - गुलाबाचे दर जैसे थे
ठाणे व्हॅलेंनटाईन डेचे ( Valentine Day 2022 ) स्वागत करण्यासाठी तरुण-तरुणींकडून गुलाबाची मागणी होते. पण, कोरोना काळापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे गुलाब विक्रीत घट झाली असल्याचे फूल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. लाल, पिवळा, केशरी, पांढरा गुलाब तरुणांना भुरळ घालतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने गुलाब शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या आशेने गुलाबाच्या दरात वाढ न करता विक्रीस आणले होते. बाजारातही मोठ्या प्रमाणात गुलाब उपलब्ध होते. पण, म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नसल्याने व्यापारी अडचणीत सापडले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST