Nana Patole On Devendra Fadnavis : काँग्रेस देवेंद्र फडणवीसांना राज्याभरातून पाठवणार पत्र - नाना पटोले
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना, 'महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा महाराष्ट्र काँग्रेसने जोरदार विरोध केला होता. मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी काँग्रेसने आंदोलनही केले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध करत, राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 'महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल माफी मागा' असे पत्र पाठवणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST