Mumbai Congress Protest : काँग्रेस-भाजपच्या आंदोलनाचा सर्वसामान्यांना फटका - काँग्रेसचे आंदोलन
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत केलेल्या विधानाचे राज्यात पडसाद उमटत आहेत. काँग्रेसने या निषेधार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाची हाक (Opposition in front of Devendra Fadnavis' house) दिली आहे. मुंबईत याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पोलिसांनी सकाळपासूनच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. मलबार हिलकडे जाणारे सर्व मार्ग बंद करून प्रत्येक वाहनांची झाडाझडती घेतली जात होती. बस, टॅक्सी आणि टू व्हीलर वाहनातून येणाऱ्यांची विचारपूस करून सोडले जात होते. चौका-चौकात नाकाबंदी होती. सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST