महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ललित पंचमीनिमित्त अंबाबाईची गजारूढ रुपात पूजा; जाणून घ्या पूजेचे विशेष महत्त्व

By

Published : Oct 10, 2021, 8:31 PM IST

Updated : Oct 11, 2021, 2:53 PM IST

कोल्हापूर - नवरात्रोत्सवामध्ये ललित पंचमी या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. करवीर निवासिनी आई अंबाबाईची आज आकर्षक पद्धतीने पूजा बांधण्यात येते. दरवर्षी ललित पंचमी दिवशी गजारूढ रूपात पूजा बांधण्यात येते, आज सुद्धा अंबाबाईची आकर्षक अशी पूजा बांधण्यात आली होती. आजच्या दिवशी म्हणजे कामाक्ष राक्षसाचा वध केल्यानंतर एक आनंदोत्सव असतो. त्यासाठी सगळ्या देव-देवतांना बोलवण्यात आले असते. मात्र, त्र्यंबोली देवीला या सगळ्याचे आमंत्रण दिलेले नसते. त्यामुळे त्र्यंबोली देवी अंबाबाईकडे पाठ करून टेंबलाई टेकडीवर जाऊन बसते. त्यामुळे अंबाबाई देवी त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी आजच्या दिवशी टेंबलाईवाडी कडे जात असते अशीही आख्यायिका आहे. त्यामुळेच आज अंबाबाई हत्तीवरून त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी जात असते. त्यामुळेच आजची पूजा गजारूढ रूपात करण्यात येत असते.
Last Updated : Oct 11, 2021, 2:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details