नवरात्रोत्सव तिसरा दिवस : अंबाबाईची कौमारी मातृका रुपात पूजा - Mahalaxmi temple Kolhapur news
कोल्हापूर - शारदीय नवरात्र उत्सवात तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची कौमारी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली. यंदाच्या नवरात्रोत्सवात आंबाबाईची सप्तमातृका संकल्पनेवर आधारित पूजा बांधल्या जात आहेत. ही पूजा अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि सुकृत मुनिश्वर यांनी बांधली आहे. या पूजेबाबत श्रीपूजक सुकृत मुनिश्वर यांनी माहिती दिली आहे. शनिवारची पूजा कौमारी मातृका रुपात आहे. ही देवांचा सेनापती कार्तिकेय याची शक्ती आहे. तिला कार्तिकी, अंबिका म्हणूनही ओळखले जाते.