पुण्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस - मराठी बातम्या
उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव परिसरात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने झोडपले आहे. अचानक पडलेल्या या गारपीटीच्या पावसाने कांदा आणि पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र, या अवकाळी पावसाने दिलासा मिळाला असून वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.