VIDEO : जाणून घ्या.. ड्रग्ज क्रूझ प्रकरणात व्हाट्सअप चॅट ठरतात किती महत्वाचे ? - आर्यन खान प्रकरण
मुंबई - कार्डेलिया क्रूझ प्रकरणात आरोपी आर्यन खान मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना जामीन मिळाला. तरीही खटल्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणून एनसीबीने व्हाट्सअप चॅट न्यायालयात समोर ठेवले आहे. या प्रकरणात व्हाट्सअप चॅट किती महत्त्वाचे आहेत या पुराव्याचा एनसीपीला किती उपयोग होईल ? याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी स्पष्टीकरण दिले आहे. व्हाट्सअप चॅट हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे. हे कोर्टासमोर ठेवून चालणार नाही. चॅटमध्ये उल्लेख असलेले पुरावे तपास यंत्रणेला सादर करावे लागतात. याच्याशी संबंधित असलेले कनेक्शन कोर्टापुढे ठेवावे लागतात. एनसीपीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शन कशाप्रकारे झाले आहे. ज्या मोबाईलने हे चॅट झाले आहेत ते मोबाइल रिकव्हर करावे लागतात. याबाबतचे पुरावे एनसीबीला समोर आणावे लागतील. त्यानंतर त्याचा उल्लेख चार्जशीट मध्ये दाखल करून कोर्टासमोर ठेवावा लागेल. चॅटच्या आधारे गुन्हा दाखल घडल्यास, त्याचे पुरावे जमा करावे लागतील. 65ब कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा लागेल. एनसीबीने कोणत्याही प्रकारचा मोबाईल कोर्टासमोर हजर आणलेला नाही. तसेच अंतरराष्ट्रीय कनेक्शन एनसीपीला दाखवता आले नाही.