गौरी पूजनानिमित्त विठ्ठल व रुक्मिणी मातेला पारंपारिक अलंकारांचा विशेष साज - pandharpur latest video
पंढरपूर - राज्यामध्ये तीन दिवसाच्या गौरीचे थाटामाटात पूजन केले जाते. गौरी पुजा दिनानिमित्ताने विठ्ठल, रूक्मिणी माते व महालक्ष्मी माते सारखा पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करून साज करण्यात आला होता. यावेळी रुक्मिणी मातेचे आकर्षक आणि देखणे रूप पाहावयास मिळाले. विठुरायाचे सावळे रूप दागिन्यांमध्ये अधिकच खुलून दिसत होते. यावेळी महालक्ष्मी मातेचे रूप मंदिरात बनवण्यात आले होते. विठ्ठल, रूक्मिणी माता, व महामक्ष्मीची मूर्तीचा विशेष साज केला होता.