शेतकरी तरुणाचा भन्नाट जुगाड, चक्क मोटारसायकलने नांगरल शेत; पाहा VIDEO - मोटारसायकलच्या साह्याने शेतीची मशागत
मुंबई - राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यात ऐन पिक काढणी आणि मशागतीच्या वेळेत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असले तरी काही भागात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याभागात मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात मशागत करत असणाऱ्या अशाच एका तरूणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शेतकरी तरूणाने शेतात मशागत करण्यासाठी नवीन आणि भन्नाट अशी कल्पना करून नांगरणी केली आहे. व्हिडिओमधील तरूण हा चक्क मोटारसायकलच्या साह्याने संपूर्ण शेताची मशागत करतांना दिसत आहे. बैल आणि ट्रॅक्टरशिवाय केलेली ही नांगरणी नेटकऱ्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे काही क्षणातच हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झालेला पहायला मिळाला.