VIDEO : अमरावतीत हिंसाचार; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी परिस्थितीचा घेतला आढावा... - अमरावती हिंसाचार बातमी
अमरावती : अमरावती मध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास शहरात विविध भागात फिरुन परिस्थितीचा आढावा घेतला. दोन तासापासून आम्ही शहरात फिरत आहे. सोबत सर्वपक्षीय लोक देखील आहेत. शहरात सध्या शांतता असल्याची प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.