Video : आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या प्रवेशपत्रात चुका; विद्यार्थी चिंतेत - जालना न्यूज
जालना - आरोग्य विभागाच्यावतीने विविध रिक्त पदाकरिता राज्यात परीक्षा घेण्यात येत आहेत. या परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे समोर आले आहे. असाच एक प्रकार जालन्यातही घडला आहे. जालन्यातील विद्यासागर रामभाऊ पवार याविद्यार्थीनीचे आधार कार्डवर नाव आहे. मात्र आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या प्रवेशपत्रावर तिचे नाव विद्या रामभाऊ पवार असे आले आहे. त्यामुळे प्रवेशपत्रात बदललेल्या नावाने परीक्षा कशी द्यावी या चिंतेत विद्यार्थीनी आहे. ईटीव्ही भारतच्या माध्यमातून या विद्यार्थीनीने अशी मागणी केली आहे की, अवघ्या दोन दिवसावर आलेल्या परीक्षा पुढे ढकलाव्यात किंवा ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रावर काही चुका आहेत, त्या त्यांना तत्काळ दुरुस्त करून द्याव्यात.