महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मुंबईत आदिवासी लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करुन केले लसीकरण - मुंबई ब्रेंकिंग

By

Published : Aug 2, 2021, 8:59 PM IST

Updated : Aug 2, 2021, 9:40 PM IST

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्कमध्ये राहणाऱ्या आदिवासींसाठी विशेष मोफत लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला या आदिवासी लोकांमध्ये लसीकरणाबद्दल गैरसमज दिसून आले होते. त्यामुळे ते लसीकरणासाठी तयार होत नव्हते. परंतु जेव्हा लसीकरणाला सुरुवात झाली, तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले, की तिकडचे आदिवासी रोज दारू पितात आणि त्यांच्यामध्ये ही अफवा पसरली होती की लसीकरण केल्यानंतर आपण दारू पिऊ शकत नाही. त्यामुळे ते लसीकरणासाठी टाळाटाळ करत होते. त्यानंतर आरोग्य पथकाने त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आदिवासी लसीकरणासाठी तयार झाले. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळपास 17 आदिवासी पाडे असून त्यामध्ये जवळपास 2600 आदिवासी राहतात. ज्यापैकी 1600 लोकांचे मोफत लसीकरण केले जात आहे.
Last Updated : Aug 2, 2021, 9:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details