नागपुरात 45 वर्षांवरील दिव्यांग बांधवांचे मोफत लसीकरण सुरू - मोफत कोविड लसीकरण केंद्र
नागपूर - केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अधीन असलेल्या नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथील समेकित क्षेत्रिय कौशल्य विकास पुनर्वसन आणि दिव्यांग सक्षमिकरण केंद्रात महानगरपालिकेद्वारे 45 वर्षांवरील दिव्यांग बांधवासाठी मोफत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. लसीकरणासाठी येणाऱ्या दिव्यांगांसाठी रॅम्प व व्हीलचेअर, दृष्टिबाधित व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील माहिती आणि श्रवण बाधित दिव्यांगाकरीता सांकेतिक भाषांतर दुभाषी यासारख्या सुलभ सुविधांसह लसीकरण मोहीम दिव्यांगाकरीता सुरू करण्यात आली आहे. या शिवाय मानसिक आरोग्य चांगले राखण्याकरिता समुपदेशन व स्वयंरोजगार संबंधी माहिती उपलब्ध केली जाणार आहे.