महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सहा महिन्याच्या आत आरोपींना फासावर लटकवा - तृप्ती देसाई - Mumbais sakinaka rape

By

Published : Sep 11, 2021, 2:14 PM IST

पुणे - मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात नेमकं चाललंय काय..कायदा सुव्यवस्था आहे का नाही. आरोपीला सहा महिन्याच्या आत फासावर लटकावून पीडित महिलेला न्याय दिला पाहिजे. राज्य सरकारकडून निव्वळ थापा मारल्या जात आहे. शक्ती कायदा गेला कुठे, आता तरी तातडीने शक्ती कायदा अंमलात आणा, अशी संतप्त प्रतिक्रिया भूमाता ब्रिग्रेडचे अध्यक्षा तुप्ती देसाई यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details