VIDEO : वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना मास्क घालण्याची विनंती - Guardian Minister Ajit Pawar
पुणे - शहरामध्ये गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या धर्तीवर कालच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Guardian Minister Ajit Pawar) यांनी कोरोना आढावा बैठक घेऊन मास्क न घालणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहे. मात्र अजूनही याबाबत जी.आर. न निघाल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात नाही. मात्र तरीही वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना मास्क घालण्याची विनंती केली जात आहे. तसेच त्यांना पुन्हा लॉकडाऊन लागू नये यासाठी मास्क घाला तसेच कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करून आपली काळजी घ्या असा सल्लाही दिला जात आहे.