जालन्यात मुसळधार पावसाची हजेरी - rain in jalna district
जालना - जिल्ह्यातील जाफ्राबाद ,अंबड, बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जाफ्राबाद तालुक्यातील सावंगी, आंबेगाव परिसरात एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर बदनापूर तालुक्यासह अंबड तालुक्यात ही वडीगोद्री मंडळात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती. सोमवारपासून शहरासह आसपासच्या परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील वातावरणात चांगलाच गारवा पसरला आहे. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.