हे कडक निर्बंध ? कोल्हापुरात मोठ्या संख्येने नागरिक पडत आहेत बाहेर - कोल्हापूर कोरोना अपडेट
कोल्हापूर - 'ब्रेक द चेन' अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध अधिकच कडक करण्यात आले आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवा वगळता आता कोणालाही बाहेर पडताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात मात्र नागरिक सर्व नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. काही नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडत आहेत, मात्र विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. या नवीन नियमावलीनंतर जिल्हा बंदी, तसेच शहरात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिक बाहेर पडत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे नियम जरी बनवले असले तरी सुद्धा नागरिक मुक्तपणे घराबाहेर पडून शहरात फिरत आहेत.