VIDEO : एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; प्रवाशांचे हाल सुरूच - etv bharat video news
धुळे - राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) शासनात विलीनीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक आगारांतील बसची चाके पुन्हा जागच्या जागीच थांबली आहेत. बस वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींची झळ बसत आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त गावी येणाऱ्या व कामावर परतणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना प्रवासासाठी कसरत करावी लागत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. मात्र, आमच्या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या.