मुंबईच्या मोहल्ला क्लिनिकमध्ये रुग्ण संख्या वाढली - Mumbai's Mohalla Clinic
मुंबई: शहरात कोरोना आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णाची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर आता मुंबईच्या मोहल्ला क्लिनिकमध्ये रुग्ण संख्या वाढली ( Mumbai's Mohalla Clinic patients increased ) आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती चिंताजनक आहे. मोहल्ला क्लिनिकमध्ये काही दिवसापूर्वी डॉक्टर एका दिवसात २० ते २५ रुग्ण तपासत होते. मात्र, आता याच डॉक्टरांना दिवसाला २०० ते २५० रुग्ण तपासावे लागत आहेत. त्यावरुन आरोग्य व्यवस्थेवर किती ताण हे लक्षात येते. त्याचबरोबर रुग्ण संख्या किती झपाट्याने वाढत याचा अंदाज येत आहे.