महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : प्रेमविवाह केल्याने मनात राग ठेवून घरच्यांनीच केला मुलीच्या अपहणाचा प्रयत्न - video story

By

Published : Jul 16, 2021, 4:02 PM IST

नालासोपारा या ठिकाणी राहणाऱ्या पालसिंग नाडार याने काही दिवसांपूर्वी पत्नी मारीया हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, हे लग्न मुलीच्या घरच्यांनाच मान्य नसल्याने 2 वर्षांनंतर मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना पाच तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, मुलीला फोन करून दहिसर येथे हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवण्यात आले. त्यानंतर काही वेळ आई आणि मावशी यांनी तिच्याशी गप्पा मारल्या व नंतर जाऊ असे सांगितले आणि मुलीला एका कारमध्ये डांबून घरच्यांनीच घेऊन गेले. मुलीसोबत तिचा दीरही सोबत आला होता. त्याने आपल्या भावाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दहिसर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली. या सर्व प्रकरणात पोलिसांनी शोध घेऊन पाच तासाच्या आत त्यांना सातारा येथून मुलीची आई, मावशी, मामाचा भाऊ, तसेच ड्रायव्हर या सर्वांना अटक करण्यात आली. यांना न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details