नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे - फ्लेचर पटेल - etv bharat live
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो वर आरोप लावत फ्लेचर पटेले कोण आहे? पंचमीच्या कारवाईनंतर वेळोवेळी ते पंत कसे असतात? याबाबत झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी उत्तर द्यावे, असे नवाब मलिक म्हणाले होते. नवाब मलिक यांच्या आरोपानंतर फ्लेचर पटेल यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण एक माजी सैनिक असून देश सेवेसाठी आपण एनसीबी ला मदत करत आहोत. वानखेडे यांच्या कुटुंबाची आपले कौटुंबिक संबंधातून फोटोमध्ये असणारी महिला या समीर वानखेडे यांची मोठी बहीण आहे. आणि त्यांनाही मी ही मोठी बहीण मानतो. त्यामुळे प्रेमाने आम्ही त्यांना लेडी डॉन म्हणतो. फोटो दाखवून नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे असून, पंच म्हणून नाव उघड केल्याने आमच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे. याबाबत आपण लवकरच कायदेशीर कारवाईसाठी पाऊल उचलणार आपल्याचे फ्लेचर पटेल यांनी सांगितले. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींने ..