ऑनलाईन ऑर्डर करताय ? ... थांबा..ठाण्यातील हॉटेल आणि बार मालकांचे आंदोलन - हॉटेल आणि बार मालकांचे आंदोलन
ठाणे - कोरोनाच्या नवीन नियमावली विरोधात ठाण्यातील बार अँड रेस्टॉरंट ऑनर्स असोसिएशन आक्रमक झाले आहेत. बार आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवुन द्या, अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील सर्व बार आणि रेस्टॉरंट संघटनेने केली आहे. ठाण्यातील हजारो बार आणि रेस्टॉरंट यामुळे बंद राहणार आहेत. यामध्ये स्वीगी, झोमॅटो च्या माध्यमातून होणारी पार्सल सेवा देखील ठेवणार बंद ठेवण्यात येणार आहे. नवीन नियमावलीमध्ये आमच्यावर अन्याय झाला असल्याची भावना बार मालकांनी व्यक्त केली आहे. ठाण्यात बार आणि रेस्टॉरंट वगळता इतर दुकान रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र, बार रेस्टॉरंटला फक्त ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिल्याने बार मालकांनी बेमुदत हॉटेल आणि बार बंद ठेवत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावर सरकारची प्रतिक्रिया काय असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.