स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरपावसात चिखलात बसून आंदोलन - swabhimani shetkari sanghtana
वाशिम - जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून पावसाचा कहर सुरु आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या ढगफुटीने आतोनात नुकसान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूचे आणि शेतकऱ्यांच्या काढणीला आलेले खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मूग, उडीदासह मोठ्या प्रमाणावर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे. मात्र, अद्यापही पंचनामे झाले नसल्याने व वाशिम जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भरपावसात चिखलात बसून आंदोलन करण्यात आले.